लक्षूमणाला जीवंत करण्यासाठी हनुमान जेंव्हा संजीवनी आणण्यासाठी द्रोणागिरी पर्वत उचलून आणत होता त्यावेळी त्या डोंगराचा काही भाग खाली पडला. तो पडलेला भाग म्हणजेच उरण करंजा ह्या गावातील द्रोणागिरी पर्वत (ही अख्यायीका उरणमध्ये प्रसिद्ध आहे). ह्या डोंगरावर जी देवी वसली आहे तिला द्रोणागिरी देवी असे म्हणतात. द्रोणागिरी देवी ही नवसाला पावते. करंजा येथिल रहिवाश्यांचे हे आराध्य दैवत आहे.
द्रोणागिरी देवी ही अगदी निसर्गरम्य परीसरात वसलेली आहे. डोंगराची हिरवाई व समुद्र किनार्यावर ही देवी भक्तांचे रक्षण करते. हे डोंगर घनदाट जंगल आहे. फक्त देवीच्या डोंगरावरचा भाग मोकळा आहे. तेथेच आजुबाजुला स्थानिक वस्तीही आहे.
नवरात्रामध्ये ९ दिवस द्रोणागिरी देवीला सजविले जाते. देवीच्या दर्शनाला भक्तांची रिघ ९ दिवस कायम असते. अष्टमीच्या दिवशी होम व गावजेवण घातले जाते. देवीच्या प्रसादासाठी अनेक भक्त स्वेच्छेने अन्न दान करतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा