शुक्रवार, १७ जून, २०१६

हिरवा चाफा

हिरवा चाफा ह्या नावकडे लक्ष केंद्रित केल की वेगळच वाटत. हिरवी पालवी, हिरवी राई, हिरवागार परिसर, हिरवी पाने, गवत हेच ऐकायची आपल्याला सवय असते. पण हिरवे फुल म्हणजे जरा हटकेच. हिरव्या रंगामुळे झाडावर तो लपाछुपीच खेळत असतो. एका नजरेत सहसा ह्याचे छोटे फुल दिसत नाही.
बाळ फुलाला वास येत नाही. ज्या दिवशी फुल तयार होते त्यादिवशी ह्याचा सुगंध परिसरात दरवळायला लागतो. हिरव्या चाफ्याचा सुगंध मात्र पिवळा झाल्यावर जास्त दरवळतो. ह्याच्या सुगंधामुळे साप ह्या झाडाखाली येतात असेही म्हणतात.
हिरव्या चाफ्याच्या झाडाला फळेही हिरवीगार लागतात. लंबगोलाकार टोकाला निमुळती आणि घडात ही फळे लागतात. त्याच्या बी पासुन रोप तयार करता येते.
ह्याचा नावाप्रमाणे हिरव्या चाफयाची पानेही हिरवीगार असतात.
Hirvachpha2.JPG
माझ्या माहेरी हे झाड आहे. मी माहेरी गेले की पहीला पाठी जाते कॅमेरा घेउन आणि झाडावर फुल आहे का पाहते. मागे गेले तेंव्हा अगदीच जन्मलेल्या बाळाप्रमाणे कळी आली होती.
Hirva chapha1.JPG
त्यानंतर बर्‍याच दिवसांनी गेल्याने ह्या आकारावर फुल आले होते.
From Apr 27, 2011
अजुन ४-५ दिवसांनी गेल्यावर पाहील तर पुर्ण होत आलेल्या फुलाचे सौदर्य न्याहाळण्यासाठी एक पाखरू त्या फुलाला साथ देत होत. तेही सुंदर होत. मी फोटो साठी फांदीला सरकवुन पोझ देत होते तरी ते त्याची साथ सोडायला तयार नव्हते. उलट त्यानेच फोटोसाठी पोझ दिल्या.
ह्याची कळी आल्यापासुन साधारण १०-१२ दिवस लागतात हे पुर्ण फुल व्हायला. दुसर्‍या दिवशी सकाळी हे फुल पुर्ण झाल होत. फुल तयार झाले की त्याच्या पाकळ्या फाकतात. अगदी वाटी दिसायला लागते. ते पाखरू अजुन हलल नव्हत.
आता दुसर्‍या दिवशी मला येता येणार नव्हत म्हणुन हे फुल मी काढुन घरी घेउन गेले. त्याच्या दुसर्‍या दिवशी हा हिरवा चाफा स्वत:वर पिवळा रंग रंगवु लागला. घरात सर्वत्र सुगंधही पसरला होता.
असा आहे महिमा ह्या हिरव्या चाफ्याचा (फोटो क्लियर नसल्या बद्दल क्षमस्व).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा