दिवाळीतील पाडव्याचा दिवस होता. सकाळीच जाऊबाईंच लक्ष किचनच्या खिडकीतून बाहेर गेल आणि त्यांनी आधी मला हाक मारली लवकर ये म्हणून. मी समजले साप, पक्षी काहीतरी आल आहे. जाऊन पहाते तर बदामाच्या सुकलेल्या झाडावर घार बसली होती. ती एकदम शांतपणे उन खात बसली होती पण माझी मात्र कॅमेरा आणण्याची घाई झाली आणि धावत जाऊन कॅमेरा आणला. पण घार शांतपणे इकडे तिकडे पहात उभी होती. घारी बद्दल ती शिकारी पक्षी आहे, जमिनीवर भक्ष दिसल की लगेच खाली येउन उचलून नेते, पायांमध्ये भक्ष उचलून नेते, वार करते अस बरच लहानणापासून मारकुटा पक्षी असच माझ्या डोक्यात घारीबद्दल बसल होत. पण प्रत्यक्ष निरीक्षणात त्या दिवशी मला तो पक्षी शांत वाटला. अर्थात भक्ष त्या त्यांच्या पोटापाण्यासाठी, पिलांसाठी मिळवत असतात जे नैसर्गिकच आहे. ही घार जवळ जवळ अर्धा तास तिथेच बसून होती. इतर पक्षांप्रमाणेच ती माझ्याकडे फोटोग्राफीसाठी आली असावी अस मला वाटल. काही खालून व काही टेरेसवरून काढलेले फोटो:
१) उन घ्याव की शिकार शोधावी

२) आली आली फोटो काढणारी आली. नीट काढ ग फोटो. चांगला उठून दिसला पाहिजे.

३) समोर बघू का?

४) काय ग बाई, काढेल ना ही नीट फोटो, काळजीच वाटते. हिच्या भरवश्यावर इतका वेळ इथे बसून आहे.

५) ह्या अॅन्गल ने काढतेस का?

६) झोपच पूर्ण नाही झाली ग.

७) तुमची चालू आहे बाबा दिवाळी आमच इथे भक्षा वाचून दिवाळ निघत आहे. शहरीकरण केलयत ना आमची भक्ष कमी झाली आहेत.

८) अशी गोंडस दिसते ना मी ?

९) माझी चोच आणि माझे डोळे माझ्या कर्तबगारीचे/शिकारीचे अनमोल अवयव.

१०) ही माझी शत्रूसाठी पोज घे. माझ्या पिलांच्या रक्षणासाठी, माझ्या रक्षणासाठी मला हा अवतार घ्यावाच लागतो.

११) पण ह्या निसर्गापुढे मी नतमस्तच आहे.

१२) निसर्ग देवतेला सलाम

१३) खेकडा, पक्षाच पिलू, सापाच पिलू काहीतरी दिसतय तिथे

१४) माझीही दिवाळी होणार आज.

१५) काढुन झाले ना फोटो?

१६) मी निघाले शिकारीला.
